Home नाशिक ठेंगोडा येथील विकसित भारत संकल्प रथ ऊत्सवाचे स्वागत         ...

ठेंगोडा येथील विकसित भारत संकल्प रथ ऊत्सवाचे स्वागत             

165
0

आशाताई बच्छाव

IMG_20231126_114020.jpg

ठेंगोडा येथील विकसित भारत संकल्प रथ ऊत्सवाचे स्वागत                                                            ठेंगोडा,( प्रतिनिधी नयन शिवदे)– ठेंगोडा गावात काल दिनांक 25/11/2023 रोजी विकसित भारत संकल्प रथाचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी डीजेच्या तालावर रथाची मिरवणूक करण्यात आली , गावात विविध घरांमध्ये रथाचे पूजन व श्रीफळ फोडण्यात आले, प्रथम यावेळी रथाचे पूजन गावच्या सरपंच यांनी करून श्रीफळ फोढले ,तसेच गावातील उपसरपंच निरभवणे यांनी पण रथाचे पूजन करून फुल वाहिली यावेळी गावातून मिरवणूक काढून दयावान मंगल कार्यालय या ठिकाणी गावातील लोकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, तसेच गावातील विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या व्यक्तींनी आपली मनोगत व्यक्त केली ,पंडित आनंदा अहिरे ,प्रभाकर साधू वाघ ,अनिल मोरे, ,अंजना बळवंत जाधव ,यांना शासनाच्या मिळाल्या योजनांचा व लाभाची माहिती सांगितली ,व शासनाचे आभार मानले तसेच यावेळी उपस्थित कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथील अधिकारी संदीप नेरकर साहेब, तसेच मंडळ कृषी अधिकारी सटाणा शैलेंद्र वाघ साहेब, समन्वयक नरेंद्र पगार साहेब, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पाटील साहेब, पवार मॅडम यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे, ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी थोरात साहेब यांनी शाल श्रीफळ फुलगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले , श्री निकम सतीश यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले ,कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविका आरोग्य डॉक्टर ,आरोग्य सेविका आशाताई , ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली तसेच यावेळी पालेभाज्या फळ भाज्या विविध बनवलेल्या वस्तू पेढे आधी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते ,त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत डेंगू डास होऊ नयेत यासाठी कोणत्या पद्धतीने उपाययोजना करावी याची माहिती देण्यात आली तसेच ओम गुरुदेव एचपी गॅस सटाणा उज्वला गॅस योजना सुरू झाली याची माहिती देण्यात आली व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here