Home गुन्हेगारी ठेंगोडा येथे सिध्दीविनायक गणेश मंदिरात चोरी

ठेंगोडा येथे सिध्दीविनायक गणेश मंदिरात चोरी

374

आशाताई बच्छाव

IMG_20231126_045131.jpg

ठेंगोडा येथे सिध्दीविनायक गणेश मंदिरात चोरी
सटाणा, प्रतिनिधी नयन शिवदे – सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथील सुप्रसिध्द सिध्दीविनायक गणेश मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार ठेंगोडा येथील सुप्रसिध्द सिध्दीविनायक गणेश मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील मुद्देमाल लंपास केला आहे सी सी टी व्हि फुटेज मध्ये चोरटे दिसत असून , पहाटे साडेचार वाजता मंदिराचे सचिव मोतीराम चौधरी हे मंदिरात पुजेसाठी गेले असता हा प्रकार नजरेस पडला त्यानंतर चौधरी यांनी या घटनेची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत पाटील व विश्वस्त गोरख सोनवणे यांना देऊन याबाबत सटाणा पोलिस स्टेशनला सचिव मोतीराम चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे,किरण पाटील , राजपूत करीत आहेत.

Previous articleसतीश घाटगे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश :जायकवाडीत आले मराठवाड्याच्या हक्काचे पाणी
Next articleठेंगोडा येथील विकसित भारत संकल्प रथ ऊत्सवाचे स्वागत             
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.