• Home
  • प्रत्येक टोलनाक्यावर फास्ट टँग बंधनकारक

प्रत्येक टोलनाक्यावर फास्ट टँग बंधनकारक

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210215-WA0031.jpg

प्रत्येक टोलनाक्यावर फास्ट टँग बंधनकारक

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्वच गाड्यांना फास्ट टँग अनिवार्य केले आहे. याची अंमलबजावणी आजापासून म्हणजेच १५ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. आज आज रात्री १२ वाजल्यापासून ही फास्ट टॅग अनिवार्य झालेली आहे. फास्ट टँग नसेल तर उद्यापासून तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल.
याआधी १ जानेवारीपासून फास्ट टँग लागू करण्यात येणार होते मात्र सरकारने याची मुदत वाढवून १५ फेब्रुवारी केली होती. त्यामुळे आता इथून पुढे नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी तुम्हाला फास्ट टँग जरुरी आहे.
कॅश ट्रान्झेक्शनच्या तुलनेत फास्ट टँगमुळे टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ यामुळे आता वाचणार आहे.
एनएचएआयच्या म्हणण्यानुसार, सध्याचा टोल पेमेंटमध्ये फास्टँगचा हिस्सा सुमारे ७५ ते ८०टक्के आहे जो सरकारला १०० टक्के करायचा आहे. यामुळे सरकार १५ फेब्रुवारीनंतर याची मुदत वाढवणार नाहीत.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment