• Home
  • शिवशंभो कबड्डी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर

शिवशंभो कबड्डी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210215-WA0032.jpg

शिवशंभो कबड्डी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर

कोल्हापूर : तळसंदे ता. हातकणंगले येथे शिवशंभो कबड्डी क्रीडा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 175 रुग्णांची तपासणी करण्यात आली .
शिवशंभो क्रीडा मंडळाच्या वतीने प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर च्या सहकार्याने मोफत सर्वरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये तपासणी केल्यानंतर पुढील उपचाराची सोय करण्यात आली. स्वागत गजानन पाटील यांनी केले. प्रास्ताविक अमोल मोहिते यांनी केले .यावेळी झालेल्या भाषणात उपस्थित मान्यवरांनी खेळाबरोबरच सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल कबड्डी क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. शिबिरांमध्ये तपासणी केलेल्या डॉक्टरांचा व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच अमरसिंह पाटील उपसरपंच सावित्री चव्हाण ,माजी पोलीस पाटील हौसराव पाटील ,माजी सरपंच बाबासाहेब पाटील ,सीमा बायोटेकचे विश्वस्त विश्वास चव्हाण ,माजी उपसरपंच संग्रामसिंह शिंदे, मनोहर चव्हाण, बाबासो चरणे, सेवा सोसायटीचे चेअरमन धैर्यशील शिंदे , सामाजिक कार्यकर्ते महादेवराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील ,महेश कुंभार, प्रकाश कोळी, धोंडीराम वळीवडे, सचिन पाटील, , शिवसेनेचे उदयसिंह शिंदे, भानुदास पाटील, प्रशांत परीट, विशाल पाटील, अमोल माने, अविनाश पोवार, रोहित चव्हाण, प्रमोद वडर, उपस्थित होते. अविनाश पोवार यांनी आभार मानले.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment