Home Breaking News 🛑 वीस वर्षांपासून रखडलेल्या ‘त्या’ रस्त्याबाबत…! खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…🛑 ✍️पुणे :(...

🛑 वीस वर्षांपासून रखडलेल्या ‘त्या’ रस्त्याबाबत…! खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

145
0

🛑 वीस वर्षांपासून रखडलेल्या ‘त्या’ रस्त्याबाबत…! खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

वारजे (पुणे) :⭕  खासदार सुप्रिया सुळे यांनी पहाणी केल्यामुळे गेली वीस वर्ष रखडलेला रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे. वारज्यात चांगले रस्ते आहेत. मात्र, गोकुळ नगर पठारावरती जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली असता अतिशय खराब रस्त्याने नागरिकांना ये- जा करावी लागत आहे. त्यामुळे मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून या गोकुळ नगर पठारावरील रस्त्याचा प्रश्न सोडवेल अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी गोकुळनगर पठारवासियांना दिली आहे.

वारजे भागातील गोकुळनगर पठार हा भाग बीडीपी झोन म्हणून ओळखला जातो. गेल्या वीस वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांनी पै -पै  करून येथे जागा घेऊन घरे बांधलेली आहेत. मात्र येथे जाण्यासाठी वीस वर्षापासून रस्त्यासाठी येथील नागरिक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. पावसाळ्यात येथील परिस्थिती अतिशय भयानक होते. नागरिकांना पायीही चालणे मुश्किल जाते. या रस्त्याने गाडी चालवणे हे मोठे जिकरीचे आहे. 20 वर्षापासून हा रस्ता तसाच पडलेला आहे. आज मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे,  विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ,  नगरसेवक सचिन दोडके,  माजी नगरसेवक बाबा धुमाळ, सुरेश गुजर, निवृत्ती येनपुरे, बाबू दोडके  यांनी या रस्त्याची पाहणी केली असता हा रस्ता अतिशय खराब असल्याचे दिसून आले.

या रस्त्या संदर्भात व येथील समस्यांबाबत नीलम डोळसकर तसेच चंद्रकांत पंडित व या भागातील नागरिकांनी खासदार सुळे यांना समस्यांचे निवेदन दिले. त्यानंतर सुळे यांनी येथील रस्त्याची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल त्यासंदर्भात मी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व राज्य शासनाशी बोलेल असे सांगितले. तसेच यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही गोकुळनगरवासियांना दिली…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here