• Home
  • 🛑 सरकारने पॅनला आधारशी जोडण्याची मुदत वाढवली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार लिंक 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 सरकारने पॅनला आधारशी जोडण्याची मुदत वाढवली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार लिंक 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 सरकारने पॅनला आधारशी जोडण्याची मुदत वाढवली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार लिंक 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 8 जुलै : ⭕ देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. यामुळे काही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने पॅनकार्डला आधार कार्डशी जोडण्याची मुदत वाढवली आहे. प्राप्तिकर विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. आता ३१ मार्च २०२१ पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.

यापूर्वीही ही तारीख बर्‍याच वेळा वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही अंतिम मुदत ३० जून २०२० होती. आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडला गेला नाही तर तुमचं पॅनकार्ड अवैध मानलं जाईल. बँक व्यवहारांसाठी आणि बँकेत खाते उघडण्यासाठीही पॅनकार्ड लागतं. त्यामुळे तुमच्या बँकेतील सर्व व्यवहार ठप्प होऊ शकतात.

➡️ सर्व प्रथम, इन्कम टॅक्सची अधिकृत साइट incometaxindiaefiling.gov.in वर भेट द्या. तिथे लिंक आधारवर क्लिक करा.

➡️ नंतर Click here वर क्लिक करा. खालील बॉक्समध्ये पॅन, आधार क्रमांक, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.

➡️ सर्व माहिती भरल्यानंतर लिंक आधार वर क्लिक करा.

➡️ आता पॅन आणि आधार जोडला जाईल. नाव किंवा नंबरमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ करु नका. याशिवाय पॅन सेंटरवर जाऊन पॅनकार्डला आधारही जोडला जाऊ शकतो.⭕

anews Banner

Leave A Comment