• Home
  • परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली – माजी आमदार घनदाट मामांचा जाहीर प्रवेश

परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली – माजी आमदार घनदाट मामांचा जाहीर प्रवेश

परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली – माजी आमदार घनदाट मामांचा जाहीर प्रवेश

विशेष प्रतिनिधि – राजेश एन भांगे

मुंबई, दि. १७ – येथे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, पालकमंत्री नवाब मलिक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट मामा व परभणी जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

अजित दादा यांनी घन दाट यांचे स्वागत करत सांगितले की, मामा २०१९ विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक होते मात्र काही कारणास्तव त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तरी सुद्धा त्यांनी नाराजी न ठेवता आज पक्ष प्रवेश केला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

घनदाट मामांच्या रूपाने परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अजून वाढेल व मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांचं योगदान राहील. पक्ष त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेत राहील अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मामांनी शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल व आजपर्यंत गंगाखेड मतदारसंघाची सेवा केली ते कार्य मी व माझा नातू भरत कायम करत राहू असे सांगितले. तसेच माझ्यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे आभार मानले आणि कोणत्याही कार्यकर्त्यासोबत दुजाभाव न करता प्रत्येकाला न्याय देईल असा शब्द दिला.

anews Banner

Leave A Comment