Home Breaking News *नाशिकमध्ये छावा मराठा कृती समितीने राबविला कोरोना टेस्ट उपक्रम*

*नाशिकमध्ये छावा मराठा कृती समितीने राबविला कोरोना टेस्ट उपक्रम*

128
0

*नाशिकमध्ये छावा मराठा कृती समितीने राबविला कोरोना टेस्ट उपक्रम* *नाशिक , (राजेंद्र वाघ शहरप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- *छावा मराठा कृती समिती अंतर्गत व नाशिक मनपा तसेच भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्याने प्रभाग २ मध्ये रॅपिड एंटिजेन कोरोना टेस्ट हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात परीसरातील नागरिकांनी व महीलांनी चांगला प्रतिसाद देत सोशल डिस्टनसिंगचे पालन करत आपली कोरोना टेस्ट करुन घेतली. या उपक्रमाला नाशिकचे खासदार मा. हेमंत आप्पा गोडसे , नंदलालजी खालसा ( प्रमुख भारतीय जैन संघटना ) , डॉ. उल्हास कुटे( संचालक साधना फाउंडेशन ) व डॉ. अजिता सोळुंके ( आरोग्य अधिकारी नाशिक मनपा ) प्रमुख अतिथी म्हणून लाभले छावा संघटनेचे संस्थापक मा. प्रा. चंद्रकांत दादा भराट साहेब , उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा. श्री. प्रमोद दादा बारसे , उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. श्री. अमोल दादा निकम व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा. श्री. प्रशांत दादा भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक जिल्हा अध्यक्ष राकेश बलराम खैरे व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मा. अनिकेत विष्णू पवार यांनी हा उपक्रम आयोजित केला हा उपक्रम यशस्वी रित्या पार पडला व वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला घाबरून न जाता आपण आपली काळजी घेऊन सुरक्षित रहावे व घरातुन बाहेर न जाणे हा उत्तम पर्याय आहे,असे नागरिकांना यावेळी राकेश बलराम खैरे व अनिकेत विष्णू पवार यांनी आव्हान केले. व तसेच कोरोना टेस्टिंग साठी आलेल्या डॉक्टर व नर्सेस चे आभार मानत त्यांचा सत्कार केला याप्रसंगी छावा संघटना सदस्य प्रफुल गायकवाड , कृष्णा मोंढे, ओमकार दंडगव्हाळ, राकेश केदारे , आकाश पवार, हर्षल सावळे, दिगंबर खरात, सुधीर निमसे, संतोष निमसे, करणं बर्वे, वि.एफ.सी. फाऊंडेशनचे अध्यक्ष हर्षल चोपडे, रोहित पाटील, महेश खैरे, राहुल पाटील,आदि.उपस्थित होते.*

Previous articleपरभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली – माजी आमदार घनदाट मामांचा जाहीर प्रवेश
Next article*कोल्हापूर च्या महापौरांना मिळाली* *महापौरपदाची मुदतवाढ*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here