• Home
  • 🛑 कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार मर्यादा…..! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार मर्यादा…..! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार मर्यादा…..! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕: शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाबाधीतांची संख्या लक्षात घेऊन शहरात रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी गाड्यांमधून चालकासह केवळ तीन जणांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना मनाई करण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम यांनी  ट्विटरद्वारे सांगितले आहे. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करण्यास सुरुवात करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यानुसार, आता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनांमधून प्रवास करताना मर्यादा येणार आहे. त्यानुसार शहरात आता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना चालकासह तीन व्यक्तींना प्रवास करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच लग्न समारंभ, अन्य सार्वजनिक व घरगुती कार्यक्रमाला ५० व्यक्तीपेक्षा जास्त नागरिक जमविण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. वेंकटेशम यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे…..⭕

anews Banner

Leave A Comment