Home Breaking News 🛑 राष्ट्रवादीकडून प्रख्यात गायक आनंद शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी…? 🛑 ✍️पुणे :(...

🛑 राष्ट्रवादीकडून प्रख्यात गायक आनंद शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी…? 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

119
0

🛑 राष्ट्रवादीकडून प्रख्यात गायक आनंद शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी…? 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕: राज्यपालनियुक्त आमदारपदांसाठी होणाऱ्या निवडीची चर्चा सध्या बंद झाली असली तरी पक्ष स्तरावर उमेदवार चाचपणीचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ४ पैकी २ जागा या पक्षेतर लोकांसाठी राखीव ठेवल्या असल्याचे वृत्त पुढे आले आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी प प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यपालनियुक्त १२ विधान परिषद सदस्यांच्या जागा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात रिक्त झाल्या. या सदस्यांची मुदत संपत आलेली असतानाच नव्या आमदारांची चर्चा सुरू झाली. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावर काय निर्णय घेणार, याविषयी संभ्रम असल्याने महाविकास आघाडी सरकारकडून सावध पावले टाकली जात आहेत. राज्य मंत्रीमंडळाने शिफारस केलेल्या नावांवर राज्यपालांचा निर्णय हा अंतिम असतो, असा आजवरचा इतिहास आहे. मात्र कोश्यारी हे सरकारला अनुकूल निर्णय घेत नाहीत, असा गेल्या काही दिवसांतली अनुभव आहे. ते प्रत्येक शिफारस निकषांच्या पातळीवर तपासून घेणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष बायोडाटा स्ट्रॉग असणाऱ्यांनाच संधी देण्याचा विचार करत आहेत.

कलाकार म्हणून आनंद शिंदे यांचे नाव महाराष्ट्राच्या घरोघरी पोहचले आहे. शिवाय शिंदे हे आंबेडकरी समुदायातून येतात. त्यामुळे सामाजिक प्रतिनिधीत्वही राष्ट्रवादी त्या माध्यमातून मिळणार आहे. शेतकरी नेता म्हणून राजू शेट्टी आणि कलाकार म्हणून आनंद शिंदे हे सर्व निकषांत बसतात, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. महत्वाची बाब म्हणजे शेट्टी- शिंदे या ऋदोघांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीशी संबंध नाही. तिसऱ्या आणि चौथ्या जागेसाठी हेमंत टकले आणि अनिल गोटे या माजी आमदारांच्या नावांची चर्चा सध्या सुरु आहे….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here