• Home
  • शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी २२ लाखांची कार खरेदी..❗🛑 ✍️:मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी २२ लाखांची कार खरेदी..❗🛑 ✍️:मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी २२ लाखांची कार खरेदी..❗🛑
✍️:मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕कोरोनामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारपुढे काटकसरीचे मोठे आव्हान आहे. अनेक विभागांच्या खर्चाला ६० टक्क्यांपर्यंत कात्री लावण्यात आली आहे.
मुंबई : राज्य सरकार अडचणीत असताना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंत्र्यांपासून कार्यालयीन कामाकरीता २२ लाख रुपये खर्चून नवीन गाडी खरेदी करण्याचा आदेश जारी केला आहे. यासाठी विशेष बाब म्हणून वित्त विभागाची मंजुरी घेण्यात आली आहे.

कोरोनामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारपुढे काटकसरीचे मोठे आव्हान आहे. अनेक विभागांच्या खर्चाला ६० टक्क्यांपर्यंत कात्री लावण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात राज्य शासनाने २० हजार कोटीचे कर्ज घेतले आहे. असे असताना, विशेष बाब म्हणून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी नवीन वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

२२,८३,०८६ रुपये इतक्या किमतीचे वाहन मधुबन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, लोअर परेल मुंबई  या कंपनीकडून खरेदी करण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. नवीन वाहनाची किंमत २० लाखापेक्षा अधिक असल्याने त्यासाठी वित्त विभागाच्या राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे, असे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात नमूद आहे…⭕

anews Banner

Leave A Comment