• Home
  • 🛑 ” ठाकरी हिसका ” मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दाखवला…! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 ” ठाकरी हिसका ” मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दाखवला…! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 ” ठाकरी हिसका ” मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दाखवला…! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ राज्यात कोरोना व्हायरसने विळखा घातलेला असताना आता राजकीय वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रालयाने केलेल्या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती आहे. यातून उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवत राष्ट्रवादीला ठाकरी हिसका दाखवला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ जुलै रोजी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. यात परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमप, डॉ. मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, प्रणय अशोक आणि नंदकुमार ठाकूर यांचा समावेश होता.

बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केलं होतं. मात्र अवघ्या ४ दिवसात या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. बदल्या रद्द करताना या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या पूर्वीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे रविवार असूनही या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी रद्द केले. यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता या बदल्या केल्या होत्या का? गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी बदल्या रद्द केल्या का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हा दणका दिल्याचं मानलं जातंय. सरकारमधील हा गोंधळ समोर आल्यानंतर सहाजिकच विरोधक टीका करण्याची संधी सोडणार नाहीत हे मात्र नक्की….⭕

anews Banner

Leave A Comment