• Home
  • 🛑 जगप्रसिद्ध Harley-Davidson भारतातून बाहेर; कर्मचाऱ्यांना मोठा फटका 🛑

🛑 जगप्रसिद्ध Harley-Davidson भारतातून बाहेर; कर्मचाऱ्यांना मोठा फटका 🛑

🛑 जगप्रसिद्ध Harley-Davidson भारतातून बाहेर; कर्मचाऱ्यांना मोठा फटका 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 26 सप्टेंबर : ⭕ जगभरात प्रसिद्ध असलेली अमेरिकेतील Harley-Davidson बाईक कंपनी भारतातून बाहेर झाली आहे. या कंपनीने भारतातून आपला गाशा गुंडाळला आहे. भारतात या बाईकची निर्मिती आणि विक्री थांबवणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. भारतात तोटा सहन करावा लागत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

क्रूझर बाइक बनवणारी अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसनची बाईक जेव्हा भारतात पहिल्यांदाच लाँच करण्यात आली, तेव्हा खूप उत्साह आणि अपेक्षा होत्या. मात्र हळूहळू त्याची विक्री मंदावत गेली. महासाथीत Harley-Davidson च्या विक्रीवर परिणाम झाला. या बाईकची मागणी घटली, विक्री कमी होऊ लागली.

2018 साली  3,413 बाईक विकल्या गेल्या. 2019 साली फक्त 2676 युनिट्सची विक्री झाली. तब्बल 22 टक्क्यांनी विक्री घटली. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात याचा परिणाम होऊ लागला आणि भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय कंपनीने घेतला. ऑगस्टमध्येच कंपनीने हालचाल सुरू केली होती आणि आता अखेर भारतीय बाजारातून ही बाईक आता बाहेर झाली आहे.

हार्ले डेव्हिडसन भारतात बंद झाल्याने आता या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. जवळपास 70 कर्मचारी आता बेरोजगार होतील. हरयाणातील बवालमध्ये या कंपनीचं अॅस्मेबली युनिट आहे.⭕

anews Banner

Leave A Comment