• Home
  • देवळ्यात भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन

देवळ्यात भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन

देवळ्यात भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन


  • (भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
    देवळा : राज्य सरकारच्या विरोधात आज देवळा येथे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या निवासस्थानी राज्यव्यापी निषेध आंदोलन छेडण्यात आले . आमदारांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हातात राज्य सरकारच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या घोषणा फलके झळकवली . यावेळ आमदार डॉ राहुल आहेर म्हणाले की ,सध्या महाराष्ट्रात अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे . राज्यात प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेत ताळमेळ दिसत नाही. अधिकारी परस्पर निर्णय घेतात बदलात. ह्या सरकारवर कुणाचाही अंकुश नाही. बेगलागम प्रमाणे सर्वच जण वागत आहेत. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४१ हजारांच्या वर गेलेली आहे. १५०० हजारांच्या वर लोक मरण पावले आहेत. येत्या मे महिन्याच्या शेवटी महाराष्ट्राचा आकडा हा ६० हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे. तरीही राज्य सरकारला याच गंभीर्य नाही. देशात अनेक राज्य हळू हळू पूर्व पदावर येत असताना महाराष्ट्रावर मात्र कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून , हा आकडा 41 हजारावर गेला आहे . रुग्णांना ऍम्ब्युलन्स मिळत नसल्याने रुग्ण रस्त्यात तडफडून मरत आहेत.देशात कोरोनाच्या एकूण संख्येपैकी ३० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. तर २४ टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तरीही सरकार हातावर हात धरून बसलेल आहे. लॉक डॉउन असताना, लोक रस्त्यावर फिरत आहेत. लॉकडॉउन मध्ये राज्यात पोलिसांवर जीवघेणे हल्ले होत आहेत , महिलांवर अत्याचार होत आहेत, साधूंची हत्या होते. यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही . पोलिसांना बेसिक पीपीई किट्स उपलब्ध नाहीत . यामुळे राज्यातील 1665 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे . तर काहींना आपले प्राण गमावावे लागले . तरीही गृह खाते बघ्याची भूमिका घेतांना दिसत असून , ग्रामीण भागात शेतकऱ्यांसह हातावर पोट असणाऱ्यांची मोठी बिकट अवस्था निर्माण झाली असून , याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याचा कारणावरून ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपला “मेरा अंगण मेरा रणांगण” आंदोलन करावे लागले . असे आमदार डॉ आहेर म्हणाले .या राज्यव्यापी आंदोलना प्रसंगी उपनगराध्यक्ष अतुल पवार , भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , विजय आहेर, किशोर आहेर, पवन अहिरराव , भाऊसाहेब आहेर , वैजिनाथ देवरे, सागर शिंदे, सोपान सोनवणे, हर्षद भामरे आदी उपस्थित होते .
    बाईट:- आमदार डॉ. राहुल आहेर
anews Banner

Leave A Comment