• Home
  • अरे गोपी तुझ्यात हिम्मत असेल तर तू फक्त फोन घे’ ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

अरे गोपी तुझ्यात हिम्मत असेल तर तू फक्त फोन घे’ ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 ‘अरे गोपी तुझ्यात हिम्मत असेल तर तू फक्त फोन घे’ 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी देखील पडळकर यांच्यावर शरसंधान केले आहे. ‘अरे गोपी तुझ्यात हिम्मत असेल तर तू फक्त फोन घे’ असे खुले आव्हान काकडे यांनी फेसबुक पोस्ट करून पडळकर यांना केलं आहे .
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे, राजकारणात मतभेद असू शकतात. पण एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का? असा सवालही काकडेंनी उपस्थितीत केला…⭕

anews Banner

Leave A Comment