Home Breaking News मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा! मागण्या पुर्ण करा नाहीतर! ९ ऑगस्ट पासून...

मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा! मागण्या पुर्ण करा नाहीतर! ९ ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन करणार ✍️औरंगाबाद ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

101
0

🛑 मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा! मागण्या पुर्ण करा नाहीतर! ९ ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन करणार 🛑
✍️औरंगाबाद ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद :⭕ मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने सरकारला इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ९ ऑगस्ट पासून मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन सुरू करेल असा सरकारला इशाराच मराठा क्राती मोर्चा समन्वयकांकडून देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. मराठा क्रांती मोर्चाच्या प्रलंबित मागण्यांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. सदर बैठकीस विरेंद्र पवार मुंबई, विनोद पाटील औरंगाबाद, राजेंद्र कोंढरे – धनंजय जाधव पुणे, दिलीप पाटील कोल्हापूर, विनोद साबळे रायगड, अंकुश कदम नवी मुंबई, करण गायकर नाशिक, माऊली पवार सोलापूर व इतर विविध जिल्ह्यांतील प्रमुख समन्वयक या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत सविस्तर चर्चा करून महाराष्ट्र सरकारकडे मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्या ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महत्त्वाच्या मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे सरकारला हा इशारा देण्यात आल्याचे यावेळी समन्वयकांकडून सांगण्यात आले आहे.

कोपर्डीच्या भगिनीला न्याय..

सारथी संस्था..
मराठा आरक्षण ७ जुलै कोर्ट सुनावणी..
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ..
मराठा आंदोलन मधील गुन्हे मागे घेणे…
मराठा वसतीगृह बंद पडली आहेत..
४७ दिवस आझाद मैदानावर २०१४ च्या ESBC उमेदवारांचा विषय…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here