• Home
  • 🛑 आठ दिवसांत मागण्या मान्य करा….! अन्यथा मातोश्रीवर ठिय्या आंदोलन 🛑

🛑 आठ दिवसांत मागण्या मान्य करा….! अन्यथा मातोश्रीवर ठिय्या आंदोलन 🛑

🛑 आठ दिवसांत मागण्या मान्य करा….! अन्यथा मातोश्रीवर ठिय्या आंदोलन 🛑
✍️ औरंगाबाद 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद :⭕ मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४२ हुतात्म्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये व घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी तसेच आझाद मैदानावर ४७ दिवस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवेत समावून घेण्याचा निर्णय येत्या आठ दिवसांत घ्या. अन्यथा आठ दिवसानंतर मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहराती क्रांतीचौक येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ८ तारखेपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली जमावबंदी व कुल्याही आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

परतु मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात ज्या ४२ तरूणांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत, एका सदस्याला सरकारी नोकरी, आझाद मैदानावर नोकरीसाठी आंदोलन केलेल्या तरुणांना सेवेत समावून घ्या, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते.

विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी काल आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रमेश केरे पाटील म्हणाले, आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी त्याची परवा नाही. पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले त्या तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. उद्या सरकार या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी कशी देणार.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४२ हुतात्म्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दहा लाखाची मदत व एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही, तशीच स्थिती आझाद मैदानावर ४७ दिवस आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या बाबतीत देखील झाले. मराठा समाजाच्या इतर मागण्यांकडे देखील सरकारचे दुर्लक्ष होत आहे. आमचे आंदोलन दडपून सरकारने गुन्हे दाखल केले असले तरी आमचा लढा सुरूच राहणार आहे.

ठिय्या आंदोलनाचे लोण मराठवाडाभर पसरत असतांना पोलिसांनी आमचे आंदोलन दडपले. आता येत्या आठ दिवसांत आमच्या प्रमुख दोन मागण्यांवर सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा त्यानंतर आम्ही मुंबईत मातोश्री बाहेर ठिय्या आंदोलन सुरू करू, असा इशारा रमेश केरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला….⭕

anews Banner

Leave A Comment