Home नांदेड रुग्ण सेवा मंडळाची निवडणूक बिनविरोध संपन्न.

रुग्ण सेवा मंडळाची निवडणूक बिनविरोध संपन्न.

30
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220404-WA0048.jpg

रुग्ण सेवा मंडळाची
निवडणूक बिनविरोध संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर: देगलूर परिसरातील गरीब रुग्णांना नाममात्र दरात वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य करणाऱ्या रुग्ण सेवा मंडळाची नुकतीच सर्वसाधारण सभा संपन्न झाली. संस्थेच्या घटनेतील नियमानुसार दर तीन वर्षाला कार्यकारी मंडळाची निवडणूक घेतली जाते. एप्रिल 2022 ते मार्च 2025 या कालावधीसाठी कार्यकारिणी निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी देगलूर महाविद्यालयातील प्रा.डॉ. माधव चोले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.व्यंकटेश काब्दे यांची तर उपाध्यक्षपदी श्री सुर्यकांत गोविंद नारलावार , सचिव पदावर श्री मनोहर व्यंकटी दाशेटवार व सहसचिव पदावर देगलूर महाविद्यालयातील प्रा.डॉ.बी आर कतुरवार यांची तसेच कोषाध्यक्ष पदावर प्रा.व्ही.जि.चिंतावार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री मधुकर गोविंदराव नारलावार ,श्री नंदकुमार मनोहर दाशेटवार, श्री देवेंद्र मोतेवार ,श्री रामचंद्र किशनराव दाभडकर ,श्री द्तात्र्येय मारोतीराव रेड्डी, डॉ.अजित व्यंकटेश काब्दे , डॉ.शोभा भूमे ,श्री भाऊराव मोरे, श्री रमेश राजेश्वर नारलावार व श्री मारोती गायकवाड यांची निवड करण्यात आली. निमंत्रित सदस्य म्हणून सौ.स्वप्ना जयराम रेखावार यांची निवड करण्यात आली.
या संस्थेने मागील 44 वर्षात हजारो रुग्णावर विविध शस्त्रक्रिया करून त्याचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य अखंडपणे चालू ठेवलेले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना नाममात्र दरात रुग्ण वाहिका पुरविणे, नेत्र तपासणी करणे व विविध शिबिराद्वारे क्षय रोग , दमा, रक्तदाब,शुगर यासारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णाच्या जीवनात आनंद फुलविण्याचे पवित्र सामाजिक कार्य ही संस्था अखंडपणे करीत आहे. प्रस्तुत संस्थेच्या वतीने दाभड ता.अर्धापूर येथे निसर्गरम्य स्वरूपाचे निसर्गोपचार पद्धतीचे सेवा केंद्र असून नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालयात महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त वाचनालय कार्यान्वित आहे. येणाऱ्या काळात संस्थेच्या मुख्य इमारतीवर अत्याधुनिक फिजीओथेरेपी सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here