Home मराठवाडा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने ३०० जनावरांना चारा...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने ३०० जनावरांना चारा वाटप. जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन.

300

राजेंद्र पाटील राऊत

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने ३०० जनावरांना चारा वाटप.

जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातुर जिल्हा शाखा विविध कार्यक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष व फोटो क्राईमचे पत्रकार महादेव पोलदासे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गणेश जिवराज जैन गोरक्षण लातूर येथे ३०० मुक्या जनावरांना चारा खाऊ घालण्यात आला. याप्रसंगी गोरक्षणचे कार्याध्यक्ष शरद गुंडलवाल यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, पत्रकार नितीन हांडे, धनंजय मुंडे, किशोर जाधव, प्रवीण पवार, राजू कासार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleरुग्ण सेवा मंडळाची निवडणूक बिनविरोध संपन्न.
Next articleहोट्टल महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी होट्टलच्या ग्रामस्थांचा पुढाकार जिल्हा प्रशासनातर्फे होट्टल मंदिरात सर्वसमावेशक बैठक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.