• Home
  • वानखेड तेआवार प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तयार लवकरच शुभारंभ”

वानखेड तेआवार प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तयार लवकरच शुभारंभ”

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220330-WA0017.jpg

“वानखेड तेआवार प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तयार लवकरच शुभारंभ”                                                            संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

आर्थिक दृष्ट्या तालुक्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचे गाव म्हणजे आवार व उकळी
या दोनही गावातील शेतकऱ्यांचा शेती माल व तालुक्याची असलेली कामे करताना खूप अडचणी होत्या त्यामुळे त्यांचे खूप आर्थिक नुकसान होऊन त्यांना ये जा करतांना खूप त्रास सहन करावा लागतो

आत्ता मात्रा हा मार्ग होत असल्याने वानखेड गाव, आवार येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिलत आहे

आवारसाठी आत्ता तालुकाचे ठिकाण 22 किलोमीटर वरून
फक्त 17 किलोमीटर होणार आहे
सोबतच वानखेड वरून तेल्हारा किंवा अकोला कडे सुद्धा जाता येणार आहे
सरळ सांगायचा अर्थ असा की जे काम 30 वर्षा अगोदर व्हायला पाहीजे ते आज आदरणीय आमदार श्री डॉ संजय भाऊ कुटे साहेब यांनी करून दाखवले
त्या बद्दल वानखेड गाववासी त्यांचे खूप खूप आभारी राहतील
वानखेड येथील बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव भारसाकडे आणि या मतदार संघातील मा.आमदार डॉ. संजय कुटे यांचे खूप मोठे योगदान या गावाला लाभले आहे.
तसेच नेहमी गावात इतर अनेक शेती किंवा इतर योजनांकरिता करीता विशेष लक्ष्य मा. आमदार साहेबांचे असते
या अनुषंगाने काल मा.आमदार साहेबांचे काल वानखेड येथे सरपंच श्रीमती रंगभाल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले आणि आणि रस्त्याच्या कामाची पाटीजवळ मा आमदार साहेबांनी नारळ फोडले
तसेच गावातील इतर अनेक शासकीय,सांस्कृतिक,धार्मिक कार्यांना भेट देऊन गावकऱ्यांना सांत्वन देण्याचे योगदान सुद्धा लाडके आमदार साहेबाचे असुन सद्या सर्व वानखेड वासियांकडून त्यांचे शब्द सुमनांनी स्वागत होत असल्याचे दिसत आहे

anews Banner

Leave A Comment