• Home
  • नवेगाव कॉम्प्लेक्स येथील स्टेट बैक समोर भीषण अपघात। ट्रक ची स्कुल बस ला धडक। चालकासह 12 विद्याथी जखमी

नवेगाव कॉम्प्लेक्स येथील स्टेट बैक समोर भीषण अपघात। ट्रक ची स्कुल बस ला धडक। चालकासह 12 विद्याथी जखमी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220331-WA0052.jpg

नवेगाव कॉम्प्लेक्स येथील स्टेट बैक समोर भीषण अपघात। ट्रक ची स्कुल बस ला धडक।
चालकासह 12 विद्याथी जखमी
गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-येथील चद्रपुर मार्गावरील नवेगाव कॉम्प्लेक्स परिसरातील स्टेट बैक ऑफ इंडिया नजीक मुख्य मार्गावर पंचर स्कुल बस ला मागच्या बाजूने मालवाहू भरधाव ट्रक ने जबर धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना आज 31 मार्च दुपारला 2 वाजता च्या सुमारात घडली .ट्रक ची धडक इतकी जबर होती की उभ्या पंचर स्कुल बस ला धडक दिल्याने स्कुल बस ही रस्ता दुभाजकावर पलटी झाली.तर ट्रक हा रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जावुन धडकला.या अपघातात चालक वाहकासह 12 विद्याथी व एक इसम जखमी झाला आहे.जखमींना शासकिय रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार संत जोफेस नॉशनल स्कुल डोंगरगाव येवली गडचिरोली येथील स्कुल बस ही विद्यार्थ्यांना घेवुन जात असतांना नवेगाव कॉम्प्लेक्स परिसरातील स्टेट बैक नजीक मुख्य मार्गावर पंचर झाली.दरम्यान रस्ता दुभाजकाच्या कडेला स्कुल बस थांबवुन पंचर दूरुस्त करीत असतांना गडचिरोली शहरातुन येणार्या सीजी 04 एचएस 1963 क्रमांकाच्या भरधाव ट्रक ने स्कुल बस ला मागच्या बाजूने दिल्याचे सागीतले.या अपघातात स्कुल बस ही रस्ता दुभाजकावर पलटी झाली तर ट्रक स्कुल बस ला धडक देत चन्नावार मेडिकल समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जावुन धडकला.यात विद्युत खांब हा क्षतिग्रस्त यात महावितरणचे 25 ते 30 हजाराचे नुकसान झाले आहे.या अपघातात स्कुल बस मध्ये असलेले चालक वाहक व 12 विद्याथी हे जखमी झाले आहेत.तर याच दरम्यान रस्ता दुभाजकाच्या बाजुने मुडझा येथील इसम हा येत असतांना या अपघाताच्या तावडित सापडला असता तो सुध्दा जखमी झाला असुन त्याच्या दोन्ही पायाला जबर मार बसला आहे.अपघातातील सर्व जखमींना उपचाराकरिता शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर अपघात होतात ट्रक चालक हा घटनास्थावरुन पसार झाला आहे.अपघाताची माहीती होताच पोलिस विभागाचे कर्मचारी सुध्दा दाखल झाले होते.दरम्यान मार्गावर काही काळ विस्कळीत झाली होती.

anews Banner

Leave A Comment