Home परभणी बोरी वालुर या मुख्य रस्त्याची दुरवस्था

बोरी वालुर या मुख्य रस्त्याची दुरवस्था

141

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0037.jpg

बोरी वालुर या मुख्य रस्त्याची दुरवस्था

 

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी:-जिंतूर आणि सेलू तालुक्याला जोडणाऱ्या बोरी वालुर या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करतांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण या रस्त्यावर वाढले आहे. मागील ५० वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, याकडे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
बोरी वालुर रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे असताना शासन नवीन रस्त्याची निर्मिती करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. परंतु, या रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याने पाठविणे गरजेचे आहे. परंतु, संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे मागील ५० वर्षापासन या रस्त्याची दयनीय अवस्था कायम आहे. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे, त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.