Home नागपूर अंधश्रध्देचा असाही प्रकार…! नागपूर हादरले…आई वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या!!

अंधश्रध्देचा असाही प्रकार…! नागपूर हादरले…आई वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या!!

138

आशाताई बच्छाव

Screenshot_20220807-172139_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे:   आई-वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या पूर्ण नागपूर हादरला! अंधश्रद्धेच्या नावाखाली भूत बाबाने तुमच्या मुलीला भूतबाधा झाली आहे असे सांगून तिला बेल्ट ने मारावे लागेल असे सांगितले. तेव्हा तिच्यावरील भूत नाहीस होईल. आई-वडिलांकडून त्या सहा६ वर्षाच्या मुलीला बेल्टने मारहाण झाली. मारहाण एवढी भयानक होती की ,ती मुलगी मारहाण सहन न करू शकल्याने बेशुद्ध पडली. त्यानंतर आई वडील घाबरले व त्यांनी त्वरित त्या मुलीला दवाखान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न केला परंतु दवाखान्यांमध्ये जाण्यापूर्वीच त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्व घटनेबद्दल पोलिसांनी मुलीच्या आई वडील व मावशी यांना अटक केली आहे. तुमच्या मुलीला भूतबाधा झाली, असे ज्या बाबांनी सांगितले त्या भूत बाबांचा शोध सुरू आहे

Previous articleयवत पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी खुनाचा गुन्हा आणला उघडकीस
Next articleदापोडीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या शतकोतर जयंती महोत्सावाचे आयोजन मान्यवरांचा सत्कार संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.