Home मुंबई सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे होणार .? अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक सादर...

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे होणार .? अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक सादर होणार

85
0

राजेंद्र पाटील राऊत

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे होणार .? अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक सादर होणार

मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत , राज्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी होत आहे . यामुळे राज्य शासनाने सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत विधेयक तयार करण्यात आला आहे . हे विधेयक राज्याच्या अधिवेशात मांडण्यात येणार आहे . या विधेयकामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे . तर काही कर्मचाऱ्यांना याचा तोटा होणार आहे .याबाबतचा विधेकय कसा आहे ते खालीलप्रमाणे पाहुयात.
या विधेयकामध्ये राज्यातील वर्ग – 1 ,2,3 प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात येणार आहे . यामुळे जे कर्मचारी वयोमानानुसार उशिरा शासन सेवेत रुजु झाले आहेत . अशा कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरीक्त सेवा मिळणार आहे . अशा कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे .
त्याचबरोबर या विधेयकामध्ये 33 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तिची सेवानिवृत्त असेही प्रस्तावित आहेत . यामुळे जे कर्मचारी कमी वयात शासन सेवेत रुजु झालेले आहेत . व ज्या कर्मचाऱ्यांची एकुण सेवा 33 वर्षे पुर्ण झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांची सक्तिीची सेवानिवृत्ती घेतली जाणार आहे .
या विधेयकामुळे काही कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे . तर काही कर्मचाऱ्यांना तोटा होणार आहे . हे विधेयक सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशात मांडले जाणार आहे . हे अधिवेशन 25 मार्च 2022 पर्यंत चालणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here