• Home
  • 🛑 कोरोना पाण्यात ‘ इतका वेळ राहु शकतो 🛑 ✍️ मॉस्को

🛑 कोरोना पाण्यात ‘ इतका वेळ राहु शकतो 🛑 ✍️ मॉस्को

🛑 कोरोना पाण्यात ‘ इतका वेळ राहु शकतो 🛑
✍️ मॉस्को ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मॉस्को:⭕कोरोना विषाणूबाबत सातत्याने नवी नवी माहिती समोर येत आहे. आधी असे म्हटले जात असे की हा विषाणू जड आहे आणि हवेत अधिक काळ न राहता कुठल्या तरी पृष्ठभागावरच पडतो.

मात्र, कालांतराने तो हवेतूनही बरेच अंतर पुढे जाऊ शकतो असे म्हटले गेले व नेहमीप्रमाणेच आधी ‘नाही-होय’ करून जागतिक आरोग्य संघटनेने त्याची पुष्टी केली.

आता पाण्यात हा विषाणू किती काळ जिवंत राहू शकतो याबाबतही संशोधन करण्यात आले आहे.

संशोधकांच्या मते, कोरोना विषाणू पाण्यातही काही काळ राहू शकतो. मात्र, पाण्यातच त्याचा नाशही होतो. ‘टॅस’ या रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ‘वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी’च्या संशोधकांनी कोरोना विषाणू पाण्यात किती वेळ राहतो याचा अभ्यास केला.

या संशोधकांनी म्हटले आहे की कोरोना विषाणूचा पाण्यात नाश होणार की नाही हे पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते. रूम टेम्परेचर असलेल्या म्हणजे सामान्य तापमानाच्या पाण्यात हा विषाणू 24 तासांत 90 टक्के मरतो आणि 72 तासांत 99.9 टक्के म्हणजे पूर्णपणे मरतो. पाणी उकळले तर तो पूर्णपणे नाश पावतो…..⭕

anews Banner

Leave A Comment