• Home
  • कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यु*

कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यु*

*कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यु*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

संपूर्ण देशामध्ये आज कोरोना महामारीचे संकट मोठया प्रमाणात फैलावत असून महाराष्ट्रसह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा व शहर परीसर हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन व महानगरपालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करूनही गेल्या काही दिवसामध्ये शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असून मृतांच्या संख्येतही वाढच होत आहे.
प्रशासनाकडून नागरीकांना विविध प्रकारे आवाहन करूनही शहरामध्ये नागरीक ठिकठिकाणी सातत्याने गर्दी करत असलेचे दिसून येत आहे. आज आपल्या शहराची परीस्थिती अत्यंत गंभीर असून आपण समूह संक्रमणाच्या टप्प्यामध्ये येवून पोचलो आहे. कोरोना रूग्णांची वाढ कोणत्याही परीस्थितीत आटोक्यात आणणे अत्यंत आवश्यक असलेने कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यु लागू करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज संयुक्त बैठक बोलवणेत आली होती. या बैठकीला शहरातील विविध राजकीय, सामाजिक व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच व्यापारी व नागरीक यांनी उपस्थित राहून कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यु लागू करण्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच प्रशासानाला विविध सुचना दिल्या आहेत.
कोणत्याही परीस्थितीत कोरोना रूग्णांची वाढ आटोक्यात आणणे अत्यंत आवश्यक असलेने आपल्या शहरात जनता कर्फ्यु लागू करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज हि बैठक बोलवणेत आली असून आजच्या बैठकीत सर्व उपस्थित मान्यवरांनी केलेल्या सुचनांचा विचार करून स्वयंस्फूर्तीने दि.11/09/2020 रोजी रात्री 12.00 वाजलेपासून ते दि. 21/09/2020 रोजी रात्री 12.00 वाजे पर्यंत कोल्हापूर शहरामध्ये जनता कर्फ्यु पाळणेचे निश्चित करण्यात आले आहे.
यामध्ये पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन अथवा महापालिका प्रशासनाची कोणतीही सक्ती असणार नाही. आपण स्वतासाठी व आपल्या कुटुंबासाठी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्युमध्ये सहभाग घेवून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करीत आहे.
सौ निलोफर आशकीन आजरेकर,
महापौर कोल्हापूर महानगरपालिका

anews Banner

Leave A Comment