• Home
  • 🛑 रिया चक्रवर्तीची आज सकाळी होणार भायखळा तुरुंगात रवानगी 🛑

🛑 रिया चक्रवर्तीची आज सकाळी होणार भायखळा तुरुंगात रवानगी 🛑

🛑 रिया चक्रवर्तीची आज सकाळी होणार भायखळा तुरुंगात रवानगी 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 9 सप्टेंबर : ⭕ अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. कोर्टाने रियाचा जामीन अर्ज फेटाळत तिला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली गेलीय. रिया चक्रवर्तीची रवानगी आज भायखळ्याच्या तुरुंगात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शनवरून रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( NCB ) कोर्टात रात्री हजर केलं. यावेळी रियाने कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी तिची बाजू कोर्टात मांडली. एनसीबीने रियाची आतापर्यंत अनेक तास चौकशी केलीय. तिची चौकशी पूर्ण झाली आहे. तसंच रियाने कधीच ड्रग्स घेतलं नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून तिने ड्रग्स मागवलं. यामुळे तिला जामीन दिला पाहिजे, असं रियाचे वकली सतीश माने शिंदे म्हणाले. तसंच जमीन मिळाल्यावर रिया चौकशीत पूर्ण सहकार्य करेल, असंही माने शिंदे कोर्टात सांगतिलं.

अभिनेत्री रिया चक्रवतीने दाखल केलेल्या जामीन अर्जाला NCB ने विरोध केला. रिया ही अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील आरोपी आहे. जामिनावर तिची सुटका केल्यास या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो, असं एनसीबीने म्हटलं. तसंच रियाने अनेक महत्त्वाच्या गोष्टी चौकशीत उघड केल्या आहेत. यामुळे त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, असं एनसीबीकडून स्पष्ट केलं गेलं.

एनसीबीने केलेला युक्तिवाद विचारात घेत कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तिला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आज सकाळी रियाची रवानगी मुंबईतील भायखळा तुरुंगात केली जाणार आहे. यामुळे रियाला रात्रभर एनसीबीच्या कार्यलयातच रहावं लागणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment