• Home
  • 🛑 अभिनेत्री सविता मालपेकर करणार या पक्षात प्रवेश 🛑

🛑 अभिनेत्री सविता मालपेकर करणार या पक्षात प्रवेश 🛑

🛑 अभिनेत्री सविता मालपेकर करणार या पक्षात प्रवेश 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 9 सप्टेंबर : ⭕ ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर उद्या, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता राष्ट्रवादीच्या मुंबईच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्य उपस्थिती जाहीर प्रवेश करणार आहेत.

अभिनेत्री सविता मालपेकर यांनी १९८८ मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

सविता मालपेकर सध्या स्टार प्रवाहवरील “मुलगी झाली हो” या मालिकेत खाष्ट सासूची भूमिका साकारत असून तब्बल ७ वर्षांनंतर त्या सासूची भूमिका साकारत आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment