• Home
  • 🛑 सारथी संस्थेला तात्काळ ८ कोटी रुपये दिले जाणार…! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 सारथी संस्थेला तात्काळ ८ कोटी रुपये दिले जाणार…! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 सारथी संस्थेला तात्काळ ८ कोटी रुपये दिले जाणार…! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई:⭕ सारथी संस्थेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आहे. संभाजीराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य करत अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

‘सारथीबद्दलची बैठक झाली. वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी देखील बैठकीला होते. मागे एकनाथ शिंदे यांनी मागे चर्चा केली होती. कोरोनाचं संकट असताना सारथी काही बंद केली जाणार नाही. वेगवेगळ्या अफवा या दरम्यान आल्या. मात्र सारथीबाबत सरकारची अतिशय सकारात्मक भूमिका आहे. मी माझं सर्वस्व पणाला लावून या संस्थेसाठी काम करणार आहे,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांच्या घोषणा
– सारथी संस्थेची स्वायत्तता टिकवणार

– सारथी संस्थेला उद्याच्या उद्या 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार, वडेट्टीवार यांचं खातं ती रक्कम देईल

– गेल्या सरकारने ही संस्था आणल्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले. सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल 14 दिवसात द्यायचा आहे

– मुख्यमंत्र्यांना विनंती करणार की सारथी नियोजन विभागाच्या अंतर्गत येणार…अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजन विभागात आणणार

– मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आम्ही ठरवलं आहे

बैठकीत नाराजीनाट्य

सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं. मात्र या बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. बैठकीदरम्यान संभाजीराजेंना बसण्यासाठी मागील बाजूची खुर्ची दिली गेल्याने मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली.

‘बैठकीवेळी संभाजीराजेंनी मागील खुर्ची देण्यात आली. अजित पवार आणि सरकारने जाणीवपूर्वक संभाजीराजेंचा अवमान केला,’ असा आरोप बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या इतर समन्वयकांनी केला आहे. त्यामुळे बैठकीत काही काळासाठी तणावाचं वातावरण झालं होतं. मात्र नंतर संभाजीराजेंनी संयमाची भूमिका घेतल्याने हा वाद मिटला…..⭕

anews Banner

Leave A Comment