Home बुलढाणा _रुधाना वकाना येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतकाच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत_...

_रुधाना वकाना येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतकाच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत_ शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांच्या प्रयत्नांना यश!

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20221230-WA0027.jpg

_रुधाना वकाना येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतकाच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत_

शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांच्या प्रयत्नांना यश!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर

खामगाव ते चांगेफळ रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून चांगेफळ ते भेंडवळ दरम्यान चावरा सखारामपूर नजीक नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र या नवीन बांधकाम होत असलेल्या पुलाजवळ कुठले ही बॅरिकेट्स लावलेले नव्हते किंवा वळण रस्ता असल्याची दिशादर्शक बोर्ड सुध्दा नव्हती त्यामुळे रुधाना वकाना येथील महादेव लक्ष्मण उंबरकर वय 35 वर्षे या युवकाचा बळी या पुलाने घेतला होता तर मोटारसायकल वर मागे बसलेले पाचखंडे गंभीर जखमी झाले. संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ऊंंबरकर यांच्या कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत द्यावी याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने यांनी सबंधित बांधकाम कंपनीकडून मागणी केली होती या मागणीची दखल घेत संबंधित कंत्राटदार कंपनीने अपघातात मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबास पाच लाख रुपये ची मदत 29 नोव्हेंबर रोजी दिली आहे
तर जखमी असलेल्या पाचखंडे कुटूंबाला एक लाख रूपये मदत दोन तिन दिवसात देण्यात येणार आहे.

महादेव लक्ष्मण उंबरकर यांच्या मृत्यू झाल्यानंतर मृतकाच्या कुटुंबास 21 डिसेंबर रोजी सात्वंनपर भेट देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने, तुकाराम भाऊ काळपांडे उपजिल्हाप्रमुख ,अमोल ठाकरे शिवसेना किसान सेना तालुकाप्रमुख, नितीन भिसे यांनी भेट दिली होती तसेच मृतकाच्या कुटुंबास संबंधित पुलाचे कंत्राट असलेल्या कंपनीकडून लवकर आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे संबंधित कंपनीला मृतकाच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यासाठी अखेर 29 डिसेंबर रोजी भाग पाडले व संबंधित कुटुंबाला 29 डिसेंबर रोजी जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने ,तुकाराम काळपांडे उपजिल्हाप्रमुख ,भीमराव पाटील विधानसभा संघटक,अमोल ठाकरे, शुभम घाटे नितीन भिसे ,शिवाजी अढाव, धनंजय अवचार, राहुल मेटांगे, रामदास मोहे,भारत वेरूळकार पोलीस पाटील , संतोष वानखडे शाखा प्रमुख रूधाना ,उमेश राऊत आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Previous articleअखेर सत्याचा विजय पत्रकार ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांना अटपुर्व जामीन मंजूर!
Next articleकावी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here