Home कोल्हापूर पाच तोळे सोने चोरी करणाऱ्यास वडगांव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पाच तोळे सोने चोरी करणाऱ्यास वडगांव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

150
0

 

वडगांव : येथील तांबवे वसाहतीमधील एका घरातील मुलानेच दोन लाख रुपयाचे दागिने लंपास गेले होते. पोलिसांनी ३६ तासांत चोरी उघडकीस आणून मुलाला अटक केली. या चोरीची घटना सोमवारी झाली होती.
या बाबत मच्छिंद्रनाथ श्रीपती पाटील वय३४ (तांबवे वसाहत) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत फिर्याद श्रीपती पाटील यांनी वडगांव पोलिसांना दिली होती.
तांबवे वसाहतीत हनुमान मंदिरा जवळ श्रीपती पाटील व मुले, नातेवाईक यांच्या सोबत राहत आहेत.
त्यांचा मुलगा मच्छिंद्रनाथ हा शेजारीच राहतो. दरम्यान, सोमवारी श्रीपती पाटील यांच्या घरातील पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. दरम्यान, तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष गोळवे, पोलीस हवालदार अमरसिंह पावरा, दादा माने, संदीप गायकवाड, योगेश राक्षे यांचे पथक तयार केले होते. त्यांनी चोरीचे सोने विक्रीला जातील, असे समजुन सराफ लाइन येथे तपास करीत होते. यावेळी एका सराफा व्यावसायिकाकडे एक जण सोने विक्रीला आल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी मच्छिंद्रनाथ श्रीपती पाटील याची चौकशी सुरू केली. सुरुवातील त्याने उडवाउडवीची उत्तर द्यायला लागला . त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर चोरीची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून एक लक्ष्मीहार, गंठण, वेल जोड, टाॅप्स, अंगठी असा एकूण पाच तोळ्यांचा ऐवज जप्त केला आहे.
त्यास येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. गायकवाड यांच्यासमोर उभे केले असता,त्याल एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
अधिक तपास पेठ वडगांव पोलीस ठाण्याचे हवालदार अमरसिंह पावरा करीत आहेत.

युवा मराठा न्युज नेटवर्क.

Previous articleत्या नराधम शिक्षकास कुंटुर पोलिसांनी केले तत्काळ जेरबंद – दोन दिवसांची पोलीस कोठडी
Next articleजलपर्णी मुक्त झाल्याने पंचगंगेने घेतला मोकळा श्वास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here