Home मराठवाडा त्या नराधम शिक्षकास कुंटुर पोलिसांनी केले तत्काळ जेरबंद – दोन दिवसांची पोलीस...

त्या नराधम शिक्षकास कुंटुर पोलिसांनी केले तत्काळ जेरबंद – दोन दिवसांची पोलीस कोठडी

198
0

राजेंद्र पाटील राऊत

त्या नराधम शिक्षकास कुंटुर पोलिसांनी केले तत्काळ जेरबंद – दोन दिवसांची पोलीस कोठडी

नांदेड,दि. ५- राजेश एन भांगे/युवा मराठा न्युज नेटवर्क

नायगाव तालुक्यातील देगाव येथे शिक्षक पेशला काळिमा फासणारी घटना असून.

येथील पूज्य साने गुरुजी विद्यालयातील शिक्षकाने मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी
शिक्षक” कुंटूर पोलीसांच्या जाळ्यात

शंकरनगर येथील विद्यालयातील घटना कांही महिन्यापूर्वी घडली असतानाच अजूनही अल्पवयीन मुलींची छेडछाड व बलात्कार प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहेत

आता नायगाव तालुक्यातील मौ.देगाव येथील पुज्य साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक बापुराव श्रीपती मोरे या शिक्षकांने दि. २ मार्च २०२१ रोजी आपल्याच शाळेतील मागास वर्गीय अल्पवयीन एका दलीत मुलीसोबत अश्लिल भाषेत बोलत छेड – छाड केल्या प्रकरणी कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून.
पोलीसांनी त्या शिक्षकास अटक केली आहे.
एकीकडे देगाव येथील शाळेचे नाव पूज्य साने गुरुजी विद्यालय असे महान व्यक्तींचे नाव असताना सुद्धा त्याच शाळेतील शिक्षक बापुराव मोरे यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्याच शाळेतील नवव्या वर्गात शिकणाऱ्या मागासवर्गीय अल्पवयीन पीडित मुलगी मातंग समाजाची आहे हे माहीत असताना देखील मोरे या शिक्षकाने वाईट उद्देशाने अल्पवयीन पीडित मुलीजवळ जाऊन नेहमी बाजूला बसून तिच्या पाठीवरून हात फिरवून तिच्या हाताला चिमट्या घेऊन त्याच्या तिच्या सोबत अश्लील भाषेत मोबाईल वरून वेळो वेळी बोलताना तुला दहावीत पास करण्याची मी हमी देतो, असे बोलून तिला जवळीक करण्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच रात्री – बेरात्री फोन करून बोलने चालू होते असे असताना सदर विद्यार्थीने त्यांचे बोलणे टाळत असले तरी तो वारंवार फोन करीत असल्याचे तिने आपल्या वडिलांना सदर शिक्षका विषयी बोलत असलेली भाषा सांगितल्या नंतर वडील व तिच्या नातेवाईकांनी रितसर माहिती
दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच सदर शिक्षकाला शाळेतून तत्काळ आपल्या ताब्यात घेतले आहे.
सदर बातमी हळूहळू सर्वत्र कळाल्या नंतर कुंटूर पोलीस ठाण्यामध्ये विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते हजर झाले होते.
सदर प्रकरणी पीडित मातंग समाजाच्या मुलीच्या फिर्यादीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली व स.पो.नी. करीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली भदवी कलम ३५४ , १२ पॉस्को आई टी. अधिनियम ६५ , ३ (१) (w) (१) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियमा नुसार कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तरी या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ हे करीत आहेत.

Previous article🛑 मुंबई गोवा महामार्गावर मृत्युंजय दूत संकल्पनेचा शुभारंभ 🛑
Next articleपाच तोळे सोने चोरी करणाऱ्यास वडगांव पोलिसांनी ठोकल्या बेड्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here