Home नांदेड साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त 30 जुलै रोजी प्रज्ञाशोध परीक्षेचे...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त 30 जुलै रोजी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन.

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20230728-WA0071.jpg

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त 30 जुलै रोजी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन.
अंबादास पाटिल पवार
लोहा /प्रतिनिधी.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त लोहा शहरांमध्ये प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर प्रज्ञाशोध परीक्षा ही दिनांक 30 जुलै रोज रविवार सकाळी ठीक 11. वाजता कै. विश्वनाथराव नळगे विद्यालय लोहा. या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे सदर परीक्षेसाठी गट अ 1ली ते 7वी तसेच गट ब 8वी ते 12वी असे दोन गट असून प्रत्येकी दोन्ही गटासाठी प्रथम पारितोषिक 3333 रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय पारितोषिक 2222रुपये व सन्मानचिन्ह तृतीय पारितोषिक 1111 रुपये व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक 701 रुपये व सन्मानचिन्ह असे पारितोषिक ठेवण्यात आलेले असून सदर प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मा. नगरसेवक अनिल दाढेल व स्पर्धा परीक्षेचे आयोजक सिद्धार्थ पांडुरंग महाबळे यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here