Home महाराष्ट्र वियानी विद्या निकेतन गडचिरोलीचे सुयश

वियानी विद्या निकेतन गडचिरोलीचे सुयश

60
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220718-WA0027.jpg

वियानी विद्या निकेतन गडचिरोलीचे सुयश

गडचिरोली – नुकत्याच जाहीर झालेल्या इंडियन
सर्टीफिकेट र्ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) 10 वीच्या परीक्षेत वियानी विद्या निकेतन गडचिरोली शाळेने घवघवीत यश संपादन केलेले आहे.वियानी विद्या निकेतन नवेगाव ही गडचिरोली जिल्यातील ICSE शिक्षण देणारी एकमेव शाळा आहे.दरवर्षी प्रमाणेच यावर्षी सुध्दा शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. कु.दिपशिका रुपराम निमजे हिने 96.60% घेऊन शाळेतून प्रथम आलेली आहे. प्रियंका प्रदिप बाला हिने 95% तर सुमित नरेश
कवाडकर याने 92.4% घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेतून 56 विद्यार्थी परिक्षेला बसलेले होते. त्यापैकी 9 विद्यार्थी 90% पेक्षावर, 24 विद्यार्थी 80% पेक्षावर तर 23 विद्यार्थी 70% पेक्षा अधिक टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्ाध्यापक फादर टॉमी, सिस्टर्स व इतर शिक्षकांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक, सिस्टर्स, शिक्षक व पालकांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here