Home नांदेड पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात

205

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0015.jpg

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जाहूर सह अंबुलगा सर्कल मधील खरीप हंगामातील पिके पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, मूग , उडीद, तुर, नगदी पीक म्हणून समजले जाणारे कापूस पीक धोक्यात असल्याने दिसत आहे.
मृग नक्षत्रात पाऊस समाधान कारक पडल्यामुळे पेरणी वेळेवर झाली, पण सतत पाऊस पडल्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे दुबार पेरणी झाली.नदी-नाल्याकाठींची शेती आति पावसाने खरडून जाऊन खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, पण भरपूर कांही शेती अति मुसळधार पावसामुळे रान चवाळ धरुन सोयाबीन, मुग, उडीद पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.आता पंधरा दिवस झाले पाऊस पडत नाही,या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पावसाने दडी दिल्यामुळे नाराजी दिसून येत आहे. कुठे पाऊस पडतो तर कुठे नाही अशामुळे हाताला आलेली पिके अक्षरशः कडक उन्हामुळे सुकुन गेलेले दिसत आहे, तर काही ठिकाणी वाळत असल्याने दिसून येते,आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संकटात आहे, प्रशासनाने सरसकट दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टर पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

Previous articleआधुनिक तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा
Next articleआमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी घेतला बूथ सशक्तीकरणाचा आढावा इल्लुर, कुनघाडा माल , चौडंमपल्ली बुथवर प्रत्यक्ष भेट घेऊन घेतला आढावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.