• Home
  • नाशिक=नाशिक मनपाची बस सेवा सुरू करण्यासाठी भुजबळ घेणार पुढाकार ,महिनाभरात बस सेवा सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न

नाशिक=नाशिक मनपाची बस सेवा सुरू करण्यासाठी भुजबळ घेणार पुढाकार ,महिनाभरात बस सेवा सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न

राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

IMG-20210201-WA0071.jpg

नाशिक=नाशिक मनपाची बस सेवा सुरू करण्यासाठी भुजबळ घेणार पुढाकार ,महिनाभरात बस सेवा सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न
प्रतिनिधी =प्रवीण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क

नाशिक=मनपाच्या बस सेवेसाठी आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतलाय मनपाची बससेवा आणखी महिनाभरात सुरू होईल आशी आशा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळाकडील तोट्यातील शहर बस हा पांढरा हत्ती महापालिकेच्या दारात बांधण्याचा निर्णय सत्तारूढ भाजपने घेतला . यासाठी खासगी ऑपरेटरच्या माध्यमातून महापालिकेच्या जवळपास 250 बसेस शहरातील रस्त्यांवर धावणार आहेत. त्यासाठी तिकीट निर्मिती दर तसेच सुविधांची निर्मिती ये सर्व वसूल करण्याची निर्मिती व जबाबदारी सर्वकाही खाजगी ऑपरेटरला न देता महापालिका करणार होती. परंतु कोरोनाचा काळ आला त्यामुळे बस सेवा लांबली जानेवारीमध्ये ही बस सेवा सुरू होईल अशी अपेक्षा असताना परिवहन विभागाकडून परिवहन परमिट च महापालिकेला मिळू शकलं नाही. आणि याच कारणावरून भाजपन सत्ताधारी महा विकास आघाडी ला जबाबदार धरणार असल्याचे चित्र शहरात तयार केलं. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ आघाडीकडून कुठलीही कमतरता नसून लवकरात लवकर हे परमिट देखील दिल जाईल. आणि नाशिककरांसाठी बस सेवा सुरू होईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे भाजपच्या ड्रीम प्रोजेक्ट ला भुजबळ यांनीच हातभार लावल्याचे नाशिकमध्ये गुनल जात आहे .

anews Banner

Leave A Comment