Home महाराष्ट्र १२-१२ रोजीचा पवार साहेबांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने , मंत्री नवाब मलीक

१२-१२ रोजीचा पवार साहेबांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने , मंत्री नवाब मलीक

213

राजेंद्र पाटील राऊत

१२-१२ रोजीचा पवार साहेबांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने ,
मंत्री नवाब मलीक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस १२ डिसेंबर रोजीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून राज्यातील किमान ८० हजार सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना वाढदिवसा निमित्त खासगी, निमशासकीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाने केला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा करताना, बेरोजगारांच्या हाताला काम देता येईल का, याचा विचार करण्यात आला. किमान काही बेरोजगारांना त्यानिमित्त रोजगार मिळवून देण्याची योजना राबविण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. ‘महास्वयंम’ पोर्टलवर सोमवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली असून १२ डिसेंबपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. या ठिकाणी जे लोक नोंदणी करतील, त्यांना रोजगाराची संधी उपब्ध करून दिली जाईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleकेंद्र सरकारला समर्थन देण्यासाठी आता शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतराव ; माजी मंत्री विखे पाटील
Next articleकोल्हापूर मधे व्यापाऱ्यांचा भारत बंदला उत्फुर्त पाठींबा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.