Home माझं गाव माझं गा-हाणं वहाळ पंचायत गण आयोजित उलवे नोड येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद...

वहाळ पंचायत गण आयोजित उलवे नोड येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद 🛑

99
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 वहाळ पंचायत गण आयोजित उलवे नोड येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद 🛑
✍️ उरण 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

उरण:-⭕शिवसेना वहाळ पंचायत समिती गण आयोजितउलवे नोड येथे भव्य रक्तदान शिबिर एम. जी एम. हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने उलवे येथील शगुन व्हाइट वूड येथे आयोजित करण्यात आलेहोते .

त्याला शिवसैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे उदाघटन रायगड जिल्हा शिवसेना सल्लागार ज्येष्ठ नेते बबनदादा पाटील यांचे हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख तथा मा .आमदार मनोहर शेठ भोईर उपस्थित होते .प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा शिवसेना संघटक सदानंदराव भोसले पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ शेठ पाटील पनवेल तालुका संघटक मर्फी शेठ क्रियाडो . उप तालुका प्रमुख हनुमान भोईर .वहाळ पंचायत गण विभाग प्रमुख सुनिल पाटील. वाहतूक सेनेचे कार्याध्यक्ष पी .एस. मुंगाजी. उलवे शहर संपर्क प्रमुख उत्तम म्हात्रे आदी मान्यवरांसह रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

असे कार्यक्रमाचे निमंत्रक उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम शेठ पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असुन राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय ना. उध्दव साहेब ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिक विभागवार ह्या कोरोणा महामारी उग्र रूप धारण केले असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शिबिरे यशस्वी करत आहेत रायगड जिल्हा प्रमुख तथा आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या सूचनेनुसार विभागवार रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्याला शिवसैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला असे जिल्हा संघटक सदानंद राव भोसले यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीशहर प्रमुख मनोज घरत वहाळ शिवसेना शाखा प्रमुख सुधीर शेठ घरत युवा सेना उलवे शहर प्रमुख ऋषिकेश म्हात्रे शाखा प्रमुख सुरी गौर शाखा प्रमुख प्रल्हाद पाटील उप विभाग प्रमुख पंकज पाटील शाखा शान पाटील बामण डोंगरी शाखा प्रमुख शरद पाटील राकेश वेदांते आदी मान्यवरांसह शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तदान करणारे कार्यकर्ते उपस्थित होते असे कार्यक्रमाचे निमंत्रक उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम शेठ पाटील यांनी सांगितले.⭕

Previous articleझेप प्रतिष्ठान तर्फे ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
Next articleकंदरमध्ये कोविड सेंटरच्या कामाला सुरुवात झाली अन् अनेकांनी मदतीचे हात पुढे केले       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here