Home मुंबई झेप प्रतिष्ठान तर्फे ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

झेप प्रतिष्ठान तर्फे ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

143
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 झेप प्रतिष्ठान तर्फे ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे :⭕सध्याच्या कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये याकरिता झेप प्रतिष्ठान तर्फे ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर निदान २८ दिवस रक्तदान करता येणार नाही त्यामुळे लसीकरण करण्याआधी रक्तदानाचे आवाहन करण्यात आलेले होते आणि त्याला प्रतिसाद देत ८२ रक्तदात्यांनी रक्तदान केले असे झेप प्रतिष्ठान चे विकास धनवडे यांनी सांगितले..

एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत झेप प्रतिष्ठान तर्फे जवळपास १०८ जणांना प्लास्मा उपलब्ध करण्यात आले असून ३० इंजेक्शन तसेच ३३ हॉस्पिटल बेड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि गेल्यावर्षी ८०० कुटुंबांना झेप तर्फे अन्न धान्याची मदत करण्यात आली होती..

झेप प्रतिष्ठानने कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांना प्लास्मादान करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे..⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here