Home पश्चिम महाराष्ट्र कंदरमध्ये कोविड सेंटरच्या कामाला सुरुवात झाली अन् अनेकांनी मदतीचे हात पुढे केले ...

कंदरमध्ये कोविड सेंटरच्या कामाला सुरुवात झाली अन् अनेकांनी मदतीचे हात पुढे केले       

123
0

राजेंद्र पाटील राऊत

कंदरमध्ये कोविड सेंटरच्या कामाला सुरुवात झाली अन् अनेकांनी मदतीचे हात पुढे केले         युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर
करमाळा,
कंदर: सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारी काळात शहरात रूग्णांना बेड मिळणे मुस्कील झाले आहे. कंदर ता.करमाळा येथील ग्रामपंचायत येथे सरपंच भास्कराव भांगे,
ग्रामविकास अधिकारी
तांबोळी S D ,ग्रामस्थ यांच्या संल्पनेने कंदरमध्ये कोविड सेंटर उभारण्याचे ठरले. आणि बघता बघता गावातील उद्योजक, शेतकरी, दुकानदार, तरूण वर्ग गट तट बाजूला ठेवून मनापासून मदतीचे हात पुढे आले. एवढेच नव्हे तर, पैशाच्या स्वरूपात, बेड ज्यांना जे देता येईल ते आठवड्याभरात धावपळ सुरू झाली. आणि प्रत्यक्ष कंदर येथे कोरोना रूग्णांसाठी कोविड सेंटर उभा करण्यात आले. प्रथमतः सर्वात मोठा जागेचा प्रश्न होता. परंतु कण्वमुनी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव राजाराम भांगे ( मालक ) यांनी शाळा देऊन जागेचा प्रश्न सोडवला.जेव्हा कंदर गावावर एखादे. संकट उभे राहते, तेव्हा सर्व ग्रामस्थ मनापासून गट तट बाजुला ठेवुन एक होऊन काम करतात. हा आदर्श इतर गावांनी घेण्यासारखा आहे.

Previous articleवहाळ पंचायत गण आयोजित उलवे नोड येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद 🛑
Next articleमेशी येथे कोव्हीड विलगिकरण कक्षाचे उदघाटन संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here