Home नांदेड डाॅ आनंदीबाई जोशी यांच्या कार्याचे आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे नगरसेविका सौ...

डाॅ आनंदीबाई जोशी यांच्या कार्याचे आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे नगरसेविका सौ गोदावरीताई सूर्यवंशी

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20230818-WA0036.jpg

डाॅ आनंदीबाई जोशी यांच्या कार्याचे आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे नगरसेविका सौ गोदावरीताई सूर्यवंशी
जीवनमान उंचावण्यासाठी महिलांनी आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात
अंबादास पाटिल पवार
लोहा
डाॅ आनंदीबाई जोशी यांनी महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम वैध्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले पहिल्या महिला डाॅक्टर बनल्या आणि महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी आरोग्य शिबीर घेतले यातून महिलांमध्ये आरोग्याची जनजागृती केली महिलांसाठी त्यांचे कार्य मौल्यवान ठरले त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे आपले जीवनमान उंचावण्यासाठी निरोगी राहण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करावी व महिलांनी आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात असे आवाहन नगरसेविका सौ गोदावरीताई गजानन सूर्यवंशी यांनी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिरात बोलताना केले
आझादी का आमृत महोत्सव व रक्षाबंधन या सणाचे औचीत्य
साधून डाॅ. आनंदी बाई जोशी आरोग्य तपासनी शिबीराचे
आयोजन करण्यांत आले होते
. या शिबिराचे आयोजन
जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. भोसीकर सर व NCD नोडल अधिकारी डॉ. हणमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिक्षक डाॅ. बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे संपन्न झाले या आरोग्य शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका सौ गोदावरीताई गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले
प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी गंगाधर सावकार सूर्यवंशी सौ सुप्रिया सचिन सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.बारी हे होते

या आरोग्य शिबीर मोहिमेत 16 ऑगस्ट 2023 ते .31 ऑगस्ट 2023 पर्यंत लोहा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे या शिबीराची सुरवात त्यांचे आरोग्य तपासण्या करून करण्यात आली
यावेळी डॉ. पानझडे मॅडम
डॉ. प्रशांत जाधव डॉ.रूबी मॅडम डॉ.मोटे सर डॉ. लोहारे सर
डॉ. शारेखा मॅडम
RBSK महिला वैद्यकीय अधिकारी
डॉ. देशपांडे मॅडम
इंचार्ज सिस्टर
सौ.स्वामी सिस्टर गजलवार सिस्टर
सौ. सोनटक्के सिस्टर व
NCD समुपदेशक
श्रीमती पेनलोड मॅडम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर रुबी मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर बसवेश्वर लोहारे यांनी केले व आभार डॉक्टर दीपक मोठे यांनी मानले

Previous articleममदापूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
Next articleपाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here