Home बुलढाणा पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ..

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ..

98
0

आशाताई बच्छाव

IMG-20230818-WA0054.jpg

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ..

तहसीलदार संग्रामपूर व पोलीस स्टेशन तामगाव यांना दिलेल्या निवेदनातून निषेध!

ब्युरो चीफ
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
बुलढाणा – लोक स्वतंत्र्य पत्रकार महासंघाचे सदस्य तथा युवा मराठा न्यूज चे बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्या उपस्थितीत तसेच राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली चे. तालुकाध्यक्ष शेख कदीर शेख दस्तगीर यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशन चे PSI सोळंके व तहसील कार्यालय येथील ना.तहसीलदार चव्हाण यांना निवेदन देण्यात आले पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांचेवर झालेल्या हल्ल्याबाबत.राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली संग्रामपूर तालुका कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की पाचोरा येथील पत्रकार श्री संदीप महाजन या युवा पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ करून दुसऱ्या दिवशी त्यांचे समर्थक गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून मारहान करण्यात आली. याबाबत तालुका पत्रकार (राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली) तालुका अध्यक्ष व इतर सर्व उपस्थित पत्रकार सदस्यांनी निषेध व्यक्त केला. एकीकडे महाराष्ट्र विधान- मंडळाचे अधिनियम व मा. राज्यपालांनी प्रस्थापीत केलेले अध्याधेष व पत्रकारांच्या सुरक्षेकरिता केलेले नियम व प्रसार माध्यमातील व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडत असतांना त्यांचेवर होणाच्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सन २०१९ नुसार अधिनियम 28 प्रमाणे माननीय राष्ट्रपती यांच्या संमतीनुसार दि. ८ नोव्हे. २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये पत्रकार सुरक्षा कायदा आहे. त्यामुळे लोकशाहीचा “चौथा आधारस्तंभ” मानल्या जाणाऱ्या व आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी झटणाऱ्या पत्रकारांवर एका लोकप्रतिनिधीकडून हल्ला होणे हि अत्यंत निंदणीय बाब आहे. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधीवर कठोर कार्यवाही व्हावी. याकरिता निवेदन देतेवेळी सर्व उपस्थित पत्रकारांन कडून जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष.रवि शेगोकार, तालुकाध्यक्ष शेख कदीर शेख दस्तगीर , उपाध्यक्ष रवी शिरस्कार, सचिव महादेव वजने, उपसचिव डॉ. नदीम खान, उदयभान दांडगे, विवेक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सदस्य नंदू खानझोड व ज्ञानेश्वर पाटील दांदळे हे निवेदन देते वेळी उपस्थित होते.

Previous articleडाॅ आनंदीबाई जोशी यांच्या कार्याचे आदर्श घेऊन महिलांनी कार्य करावे नगरसेविका सौ गोदावरीताई सूर्यवंशी
Next articleरिपब्लिकन सेनेच्या आंदोलनास अखेर यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here