Home अमरावती अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी; प्रदेश काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर यांची मागणी.

अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी; प्रदेश काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर यांची मागणी.

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0045.jpg

अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी; प्रदेश काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर यांची मागणी.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा
पीएन देशमुख.
ब्युरो चिफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारणीच्या टिळक भवन दादर येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा झाली. अमरावती लोकसभेची जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून ती मूळ काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडे स्थानिक स्तरावरील उमेदवार नाही त्यांना बाहेरून उमेदवार आयात करावा लागतो. निवडणूक आल्यावर उमेदवार स्वतःच निर्यात होतो काँग्रेस पक्षाकडे स्थानिक स्तरावर सक्षम व प्रबळ उमेदवार आहेत. त्यामुळे अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसने तक्रार व्हावी अशी आग्रही मागणी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर यांनी केली. मागील २५ वर्षापासून अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे पंजाच नसल्याने याचा परिणाम विधानसभेत झालेला आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा छत्रपती शिवाजी महाराज, मौलाना अब्दुल कलाम आझाद व राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची असून या विचाराचा उमेदवार पक्षाने दिल्यास अमरावती लोकसभा मतदारसंघात सामाजिक न्यायचा संदेश जाईल. असे वस्तुस्थितीदर्शक प्रभावी मुद्दे बोरकर यांनी बैठकीत मांडून सर्व ज्येष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले. त्यांच्या या भूमिकेस पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत, माजी मंत्री यशोमती ठाकूर, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते एडवोकेट दिलीप येडतकर, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मागणी करताना सरचिटणीस किशोर बोरकर हे ही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here