Home उतर महाराष्ट्र प्रकाश किरण प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर वीणा रारावीकर , डॉ . रमाकांत कोलते...

प्रकाश किरण प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर वीणा रारावीकर , डॉ . रमाकांत कोलते , भारत सातपुते , डॉ . अजय देशपांडे , डॉ . अण्णा वैद्य , डॉ . बाबुराव उपाध्ये , डॉ योगिता रांधवणे यांना पुरस्कार

403
0

आशाताई बच्छाव

IMG_20240127_081311.jpg

प्रकाश किरण प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर
वीणा रारावीकर , डॉ . रमाकांत कोलते , भारत सातपुते , डॉ . अजय देशपांडे , डॉ . अण्णा वैद्य , डॉ . बाबुराव उपाध्ये , डॉ योगिता रांधवणे यांना पुरस्कार
श्रीरामपूर / प्रतिनिधी दिपक कदम:- येथील प्रकाश किरण प्रतिष्ठानचे २०२३ या वर्षाचे उत्कृष्ट साहित्य ग्रंथ पुरस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक , अध्यक्ष लेविन भोसले यांनी जाहिर केले .
प्रकाश किरण प्रतिष्ठान मागील १६ वर्षांपासून साहित्यिकांच्या दर्जेदार पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे . वाचन संस्कृती वाढावी , वाचनाची , लेखनाची गोडी निर्माण व्हावी , नवोदित लेखक कवींना प्रोत्साहन मिळावे , उत्तेजन व प्रेरणा मिळावी यासाठी हे पुरस्कार दिले जातात .
सन २०२३ च्या पुरस्कारासाठी गुजगोष्टी शतशब्दांच्या ( अलकसंग्रह ) वीणा रारावीकर , मुंबई , चांदणे शिंपीत जा (लेखसंग्रह ) – डॉ . रमाकांत कोलते , यवतमाळ , शिकाळं (कथासंग्रह ) – भारत सातपुते , लातूर , हे मानवा . . . निर्मिक तू … ( कवितासंग्रह ) – डॉ . बाबुराव उपाध्ये , श्रीरामपूर , मराठी ग्रामीण आई : स्वरूप आणि शोध ( संशोधन ग्रंथ ) – डॉ योगिता रांधवणे श्रीरामपूर आणि दृष्टान्त वैभव – केशिराज संपादित निवडक ४० दृष्टान्त ( संपादन ) – संपादक डॉ अजय देशपांडे व डॉ . अण्णा वैद्य या साहित्यकृतींची निवड जाहीर झाली आहे .
गौरवचिन्ह , सन्मानपत्र , शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे प्रतिष्ठानचे संस्थापक ,अध्यक्ष लोविन भोसले , उपाध्यक्ष किरण भोसले , सचिव प्रकाश भोसले , कोषाध्यक्ष सौ विजया भोसले ‘ सदस्य सौ . पल्लवी किरण भोसले , सौ . अनुराधा प्रकाश भोसले , आकाश किरण भोसले , कु . अवनी प्रकाश भोसले , कु . स्नेहा किरण भोसले यांनी अभिनंदन केले .
सर्व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना लवकरच समारंभपूर्वक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here