Home भंडारा 74 व्या प्रजासताक दिनी उत्कृष्ठ आयुर्विमा प्रदात्यांचा एल आय सी नागपुर मंडल...

74 व्या प्रजासताक दिनी उत्कृष्ठ आयुर्विमा प्रदात्यांचा एल आय सी नागपुर मंडल तर्फे गौरव सत्कार

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240127_075735.jpg

74 व्या प्रजासताक दिनी उत्कृष्ठ आयुर्विमा प्रदात्यांचा एल आय सी नागपुर मंडल तर्फे गौरव सत्कार

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपुर मंडल कार्यालयातर्फे 74 व्या प्रजासताक
दिनी ध्वजारोहण वरिष्ठ मंडल प्रबंधक मलिक सर यांचे हस्ते संपन्न झाले. आयोजित एल आय सी प्रजासताक दिवस स्पर्धेत मुख्य विमा सल्लागार पुजा कुरंजेकर सी एल आय ए यांच्या समुहास चंदु लिखार सहाय्यक यांच्या मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून या मार्गदर्शनामुळे समुह अभिकर्त्यांनी स्पर्धेत १०४ पॉलिसी पुर्ण केल्या. रोशन कापगते यांनी साकोली शाखेत १८ पॉलिसी करीत स्पर्धेत प्रथम स्थानावर उच्चांक गाठला. ( २६ जानेवारी ) ला संपन्न या सोहळ्याला त्यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी नागपूर मंडल प्रबंधक मलिक यांनी आपले मनोगत सांगितले की भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक जनतेच्या पुढील भविष्याची काळजी घेत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना समोर काही आर्थिक त्रास जाणवणार नाही हेच “योगक्षेम वहाम्यहम्” या ब्रिदवाक्याचा प्रत्येकांनी बोध घेत भारतीय आयुर्विमा महामंडळाचे हर घर विमा या ध्येयातून “सर्वसामान्यांना आधार यातूनच भविष्याचा विचार” हा आपण संकल्प मनात ठेवून कार्यकुशलतेने आपले ध्येय साध्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. सत्कारात शिल्ड साठी पात्र ठरलेले प्रमोद गजभिये १४ पॉलिसी, अर्चना उके १३ पॉलिसी, पोर्णिमा ठाकरे ११ पॉलिसी आणि प्रमोद ठाकरे ११ पॉलिसी यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे पुजा कुरंजेकर यांचा एल आय सी मिशन समुह नागपुर विभागांतील साकोली शाखेत स्पर्धेत १०४ पॉलिसी करीत प्रथम स्थानावर आला. साकोली शाखेतील १२ अभिकर्ता नागपुर मंडल कार्यालयातर्फे आयोजित मानचिन्ह प्रतियोगितेसाठी पात्र ठरले त्यापैकी पुजा कुरंजेकर समुहातील ५ अभिकर्त्यांचा समावेश आहे. याप्रसंगी समुहातील ५ अभिकर्त्यांचा सत्कार नागपुर येथे वरिष्ठ मंडल प्रबंधक मलिक सर यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी मुख्य विमा सल्लागार पुजा कुरंजेकर यांनी या यशाबद्दल पुर्ण श्रेय समुहातील अभिकर्त्यांना व शाखेतील समुहाचे मार्गदर्शक चंदु लिखार यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here