Home अमरावती कुर्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातिल१२वी च्या विद्यार्थ्यांनि उत्तीर्ण होऊन ,उत्कृष्ट यशाची परंपरा...

कुर्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातिल१२वी च्या विद्यार्थ्यांनि उत्तीर्ण होऊन ,उत्कृष्ट यशाची परंपरा कायम ठेवली.

312
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0053.jpg

कुर्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातिल१२वी च्या विद्यार्थ्यांनि उत्तीर्ण होऊन ,उत्कृष्ट यशाची परंपरा कायम ठेवली.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पीएन देशमुख.
ब्यूरो चिफ रिपोर्टर.

अमरावती.

अमरावती जिल्ह्यातील कुर्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व विशेष प्राविण्य प्राप्त करून कुर्हा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी१२वीत उत्तीर्ण होऊन भरघोस यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवलेली आहे.

अशोक शिक्षण संस्था अशोकनगर द्वारा संचालित कुऱ्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कनिष्ठ महाविद्यालयाची निकालाची परंपरा कायम राखली.कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 76.00 % टक्के एवढा निकाल लागला. कुऱ्हा कनिष्ठ महाविद्यालयातून एच. एस. सी .परीक्षेला 150 विद्यार्थी प्रवेशित झालेले होते. पैकी 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले व 5 विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखत कु .आचल सुनील इंगोले हिने 84 .33 % टक्के गुण प्राप्त करून कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी दिपक पोकळे हिने 81.83 % टक्के गुण प्राप्त केले. तर तृतीय क्रमांक कु. आचल रविंद्र जाधव हिने 81.50 % टक्के गुण प्राप्त करून मिळविला आहे.
तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये कु. वैशाली धनराज सुलताने 79.00 % टक्के, कु.सोनाली गोविंद नेवारे 75.17 % टक्के, कु. चंचल निरंजन चव्हाण 74.17 % टक्के गुण प्राप्त करून या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचा बहुमान वाढविला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन अशोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय मा. सुधीरकुमार नारायण शेंडे व कार्यकारिणी मंडळातर्फे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. एस. पी. सामुद्रे मॅडम, जेष्ठ प्राध्यापक ए. डब्ल्यू. इंगळे सर, प्रा. कु. एस. पी. ढोले मॅडम, प्रा. एच. एन. बोके सर, प्रा. एन.एस.घुनारे सर, प्रा. एम. एच. वाळके सर, प्रा. एस. आर. जिरापुरे सर, प्रा. एस. पी. रवाळे सर, प्रा. पी. एम. श्रीखंडे सर व प्रा. एम. एस. शिरभाते मॅडम, पी. एम. राऊत सर तसेच सर्व शिक्षकवृंद, व शिक्षकेतर कर्मचारी वर्गातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकवृंदा तर्फे प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

Previous articleअमरावती लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी; प्रदेश काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर यांची मागणी.
Next articleनाशिक पूर्व विधानसभा यूवक कॉंग्रेस तर्फे शाखा स्थापन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here