राजेंद्र पाटील राऊत
भाजपा मनमाड शहर व भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी समाजास राजकीयआरक्षण मिळणे साठी रास्ता रोको आंदोलन
मनमाड प्रतिनिधी (अमोल बनसोडे ) भारतीय जनता पार्टी मनमाड शहर ,भाजपा ओबीसी मोर्चा मनमाड शहर शनिवार दिनांक 26 /04/2021 रोजी भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी,भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष गोविंद सानप, भाजपा सरचिटणीस एकनाथ बोडखे, नितिन परदेशी भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी व्यापारी आघाडी जिल्हासरचिटणीस सचिन लुणावत भाजपा आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत यांचे नेतृत्वाखाली जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले* *या भाजपा च्या रास्ता रोको आंदोलन मूळे मनमाड -अहमदनगर मार्गा वरील दुतर्फा वाहतूक बऱ्याच काळा पर्यंत थांबली होती भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कोण म्हणतं देणार नाही घेतल्या शिवाय रहाणार नाही, भारतीय जनता पार्टी चा विजय असो ,महाविकास आघाडी सरकार चा धिक्कार असो अश्या घोषणा नि परिसर दुमदुमून गेला
*काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण घालविले म्हणून महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने ओबीसी समाजाला न्याय मिळवून देणे साठी हे आंदोलन आहे 1994पासून या ओबीसी राजकीय आरक्षण मुळे 3 लाख पेक्षा जास्त ओबीसी बांधवांना राजकीय नेतृत्व ची संधी मिळाली राज्य सरकारच्या बेजबाबदार हलगर्जीपणा मूळे आगामी काळात ओबीसी समाजाला राजकीय दृष्ट्या वंचित राहावे लागणार आहे तरी महाविकास आघाडी च्या सरकारने हे ओबीसी आरक्षण त्वरीत लागू करावे अन्यथा भाजपा महाराष्ट्रात कोणत्याही निवडणूका होऊ देणार नाही आणि या ओबीसी च्या सामाजिकन्याय साठी या पेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, व भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी यांनी या प्रसंगी आपले आवेशपूर्ण भाषणातुन दिला* या प्रसंगी भाजपा पदाधिकारी च्या वतीने सर्कल अधिकारी चौधरी यांना निवेदन देण्यात आले या रास्ता रोको आंदोलन मध्ये उमाकांत राय, जलील अन्सारी,अमित गोगड, आनंद बोथरा डॉ सागर कोल्हे,सुनील पगारे ,बुधणबाबा शेख, अकबर शहा,मकरंद कुलकर्णी, सचिन कांबळे,मूर्तिजा रस्सीवाला नारायण जगताप, आशिष चावरीया,आनंद काकडे,गौरव ढोले,अनंता भामरे, अमित सोनवणे, सचिन छाजेड,संजय चोपडा, बुऱ्हाण शेख,दीपक पगारे,शंकर सानप, आनंद सानप, संतोष पगारे,विलास पगारे,जितेंद्र पगारे प्रकाश खंडागळे, मोहम्मद अली शेख ,पंकज झालते, पवन भालेराव सुरेश परदेशी, अभिषेक सानप, फातेमा मलतारी,युवराज उल्हाळे, मउद्दीन अन्सारी ,मोहम्मद अमीन यांचे सह कार्यकर्ते व हित चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या रास्ता रोको आंदोलन चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, सरचिटणीस एकनाथ बोडखे, ओबीसी आघाडी चे मनमाड शहर अध्यक्ष गोविंद सानप,अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष जलील अन्सारी,सरचिटणीस नितीन परदेशी यांनी केले या आंदोलना च्या वेळी मनमाड शहर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचे मार्गदर्शन मध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता