Home भंडारा शितला माता मंंदीर येथे साठ वर्षानंतर ‌काकड आरती कार्तिक मासात पहाटे होते...

शितला माता मंंदीर येथे साठ वर्षानंतर ‌काकड आरती कार्तिक मासात पहाटे होते गजर !

60
0

आशाताई बच्छाव

IMG_20231115_065800.jpg

शितला माता मंंदीर येथे साठ वर्षानंतर ‌काकड आरती

कार्तिक मासात पहाटे होते गजर !

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) : – उठा, उठा हो सकल झाली… आता जागे व्हा रे, आता स्मरण करा पंढरीनाथा अशाप्रकारे भक्तीमय भजनानी पहाटेची सुरुवात होते. भल्या पहाटे मंदिरात काकड आरतीचे आवाज कानी पडताच भक्तिमय वातावरण अनुभवास येते. कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने आदिशक्ती शितला माता मंंदीर येथे साठ वर्षानंतर यावर्षी प्रथमच ‌काकड आरतीला सुरुवात करण्यात आली आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून काकड आरतीला सुरुवात होते. हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात दिवाळी हा मोठा धार्मिक सण येतो. महिनाभर पहाटे – पहाटे काकडा केला जातो. आदिशक्ती शितला माता मंदिरात काकड आरतीत सहभागी भाविक पहाटे उठून स्नान करून मंदिरात एकत्र येत असतात.
कार्तिक महिना हिवाळ्यात येत असते. आणि हा महिना मानवाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. कारण पहाटेला ऑक्सिजनचे प्रमाण अधिक मिळत असते. हरिनामाचा गजर केल्याने मन प्रशन्न होते. यामुळे कार्तिक मासात भक्तिचा सुगंध वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेला आंघोळ केल्याने संपूर्ण दिवस हा आनंदाने प्रशन्न‌ वाटत असतो.
रामप्रहरी आरती, वासुदेव आणि सहस्त्र पुराण ऐकायला मिळत असते. भाविक भक्त मोठ्या उत्साहात हरिनामाचा गजर मधूर व तालबध आवाजात जोपासत आहेत. हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन भजन गातात. आणि रोजच्या रोज नव-नविन प्रसाद आणण्यासाठी भाविकांचा क्रम ठरत असतो. यामुळे काकड आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
काकड आरतीसाठी वसंतराव कुर्वे यांच्या मधूर आवाजात आदिशक्ती शितला माता मंदिराचे अध्यक्ष ईश्वरलाल काबरा, कोषाध्यक्ष धनराज धुर्वे, विजय हाडगे, विलास केजरकर, पुरूषोत्तम वैद्य, इंदिरादेवी काबरा, कल्पना चांदेवार, रामेश्वर येळणे, मोहन अग्रवाल, हिरालाल लांजेवार, क्रिष्णा किरपाने, हिरालाल ब्राम्हणकर, अंकुश हलमारे, पंडित सी.पी. मिश्रा, वामन गोंधुळे, रामविलास सारडा, संजय आयलवार, नागपुरे, माधवी राऊत, रिना नांदेकर, धनराज देशकर, गौरी सक्सेना, उज्वला मानापूरे, सुरेखा फुलझेले, ममता पडोळे, मंगला माकडे, मिना कांबळे, धनराज देशकर, किरण साखरवाडे, रिना डोगरा, संगिता गोसेवाडे, शुभांगी घोगरे, शकुंतला गभणे, रेखा सिंग, स्नेहा, भिष्मा टेंभुर्णे, संजू डहारे, राजेश गभणे, रमेश गोटेफोडे, दिलीप वाघाये, किशोर पेटकर, शेखर जोगडेकर सह शितला माता योगा मंडळातील महिला-पुरूष सदस्य इत्यादी भाविक -भक्त मोठ्या उत्साहात काकड आरतीत सहभागी होत असतात.
विशेष म्हणजे शितला माता मंंदीर येथे साठ वर्षानंतर ‌काकड आरतीला सुरुवात झाली आहे. तसेच काकड आरती व प्रसाद वितरण झाल्यानंतर योग साधक -साधिका नियमित योगा करत असतात.

Previous articleमंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची घेतले भेट!
Next articleस्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर ही पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाकरता महान कार्य
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here