• Home
  • चांदवडच्या पर्यटनाला गेलेल्या पाच युवकांपैकी दोन युवकांना काय झाले? वाचा सविस्तर आजची घटना*

चांदवडच्या पर्यटनाला गेलेल्या पाच युवकांपैकी दोन युवकांना काय झाले? वाचा सविस्तर आजची घटना*

  1. *चांदवडच्या पर्यटनाला गेलेल्या पाच युवकांपैकी दोन युवकांना काय झाले? वाचा सविस्तर आजची घटना*
    ( भिला आहेर युवा मराठा न्युज)
    देवळा:-दि.१३ दहीवड परिसरातील व कसमादे परिसरात सध्या पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारा चोरचावडी धबधबा चर्चेचा विषय बनला आहे. धबधब्यात भिजण्याचा व पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पाच मित्र रविवारी चोरचोवडी येथे आले. मात्र नंतर जे घडले ते दुर्देवीच होते. वाचा काय घडले?

रविवार (ता.१३) पर्यटनासाठी वडाळीभुई (ता. चांदवड) येथील अजिंक्य जाधव, संकेत जाधव, सागर जाधव, शुभम गुजर व ऋषिकेश तोटे हे पाच युवक चोरचावडी धबधब्याच्या परिसरात पर्यटनासाठी आले होते. एकमेकांचे जीवलग असलेले हे पाच जण धबधब्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याची पातळी जास्त असल्याने पाण्यात ते डूबू लागले. त्यातील अजिंक्य, संकेत, सागर तिघांना बऱ्यापैकी पोहता येत असल्याने ते पाण्यातून कसेबसे वर आले. मात्र शुभम व ऋषिकेश या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते जागीच बुडाले. दोघांनाही पाण्यातून वर काढले तेव्हा त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. जीवाच्या आकांताने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न शेवटी अपयशी ठरला.

येतांना जरासुद्धा कल्पना नव्हती, की हा मित्रांसोबतचा शेवटचा प्रवास असेल. ग्रामस्थांनी वेळेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना कळविले. पुढील घटनेचा तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर व पोलीस कर्मचारी करीत आहे.

anews Banner

Leave A Comment