• Home
  • सोनी_मराठी TV चॅनल वरील सावित्री ज्योती या मालीके मधील चमत्कार दाखवनारा प्रकार थांबवावा*

सोनी_मराठी TV चॅनल वरील सावित्री ज्योती या मालीके मधील चमत्कार दाखवनारा प्रकार थांबवावा*

*जय जिजाऊ जय शिवराय
सोनी_मराठी TV चॅनल वरील सावित्री ज्योती या मालीके मधील चमत्कार दाखवनारा प्रकार थांबवावा*
जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-SONY मराठी | वर सावित्री-जोती ही उत्तम मालिका सुरू आहे, आम्ही दररोज पाहतो. शिक्षणाचे जनक समाजसुधारक सावित्रीबाई फुले व महात्मा फुले आज प्रत्येक घराघरात पोचले पाहिजेत. परंतु सध्या ‘चमत्कार’ सुरू आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाठीमागे कोणती साक्षात “देवी” किंवा अवतार दाखवण्याचा प्रकार सुरू आहे; सत्यशोधक फुले दांपत्य अचानक दैववादी दाखवण्याचा हा प्रकार सुरू आहे, तो तात्काळ थांबला पाहिजे. सावित्रीबाई फुले दैवी चमत्कार नाहीत. त्यांनी दगड, गोठे, शेन, अंगावर खाऊन शिक्षणाची चळवळ सुरू केली होती. त्यांनी खूप त्रास सहन केला आहे. म्हणून आम्हाला खोटं, चमत्कारिक किंवा अपारंपरिक सहन होत नाही. कृपया तात्काळ हा दैववादी प्रकार थांबवावा जो सिरीयल डायरेक्टर आहे त्याच्यावर योग्य कारवाई करावी असे निवेदन रोहित दादा विचार मंचाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी रोहित दादा विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर , विचार मंच तालुकाध्यक्ष निळकंठ पाटील , तालुका उपाध्यक्ष पांडुरंग पाटील वडजे , कार्याध्यक्ष अमोल वाकोडे, सचिव मनोहर नागराळे ,सह सचिव निळकंठ पाटील चांडोळकर, गणेश पाटील होकर्णे , विशाल पाटील वडजे उपस्थित होते.

SONY मराठी | चांगल्या मालिकेला विनाकारण गालबोट लावण्याचा प्रकार करु नये…

anews Banner

Leave A Comment